बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…अन्यथा आणखी वाईट परिस्थिती ओढवेल’; सिब्बलांचा पक्षनेतृत्वाला इशारा

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये इनकमिंगला सुरुवात झाली असून जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वाला सूचक इशारा दिला आहे.

जितीन प्रसाद यांच्या कृतीवर माझा आक्षेप आहे. मात्र त्यांनी जे केलं, त्याविरोधात मी नाही. त्यांच्याकडे त्यासाठी योग्य कारण असू शकेल. पण भाजपमध्ये प्रवेश करणे हे मी समजू शकत नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

मला खात्री आहे की, नेमकी समस्या काय आहेत, याची नेतृत्वाला माहिती आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे आहे की, नेतृत्व लोकांचं ऐकेल. कारण ऐकल्याशिवाय काहीही तग धरू शकत नाही. पक्षांतर्गत समस्यांचे निराकरण केलं गेलं नाही हे खरं आहे. या समस्यांची शक्य तितक्या लवकर दखल घेतली गेली पाहिजे, असं सिब्बल म्हणाले.

काँग्रेसने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मोठा पक्ष व्हायला हवं. त्यासाठी पुनर्रचना करणं गरजेचं आहे. पक्षप्रमुखाने ऐकलंच नाही किंवा ऐकणं सोडून दिले, तर संघटना कोसळेल. पक्षाने आमचं ऐकावं, एवढीच आमची अपेक्षा आहे, असं सांगत तुम्ही जर ऐकलं नाहीत, तर तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढवेल, असा इशाराही सिब्बल यांनी दिला आहे. तसेच माझ्या जन्मापासून मी भाजपला विरोध करत आलो आहे. त्यामुळे जिवंतपणी मी भाजपमध्ये जाणार नाही, असं कपिल सिब्बल यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद

गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांवर कविता लिहिल्याने गुजरात साहित्य परिषदेने कवयित्रीला ठरवलं नक्षली!

‘शिवसेनेला जो काही धडा शिकवायचा आहे तो….’; चंद्रकांत पाटलांचा इशारा

रितेश-जेनेलियाचा ‘तो’ मजेशिर व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More