बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मेव्हणीसोबत पळाला, बायकोची आठवण आल्यावर तरूणाने केलं धक्कादायक कृत्य

नवी दिल्ली | गुजरातच्या अहमदाबादमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या बायको सोबत मिळून मेव्हणीची हत्या केली आहे. मागील काही दिवसात तरूण आपल्या मेव्हणीला घेऊन पळून गेला होता. मात्र नंतर काही दिवसांतच मेव्हणीचा मृतदेह सापडल्यानं कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी हितेंद्र पटेल आणि बायको पुनीतासोबत मिळून मेव्हणीच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर मेव्हणी कोमलला आरोपी हितेंद्र आणि पुनीता दोघांनी मिळून बेशुद्ध केलं. मेव्हणी कोमलच्या तोंडावर मच्छर मारण्याचं औषध टाकलं. त्यानंतर आरोपी नवरा बायकोने कोमलचे हात पाय दोरीने बांधून नर्मदा नदीत फेकून दिलं.

पोलीस पथकाकडून गेल्या काही महिन्यांपासुन कोमलचा शोध सुरू होता. जानेवारी महिन्यात पीडित कोमलचा मृतदेह नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर आढळून आला होता. पोलीस तपासानंतर मृतदेहाची ओळख पटली. 2019 ला पत्नीला सोडून आपण पळून गेल्याचं आरोपीनं चौकशीवेळी सांगितलं.

दरम्यान, सहा महिन्यानंतर आरोपी पुन्हा घरी आल्यावर पत्नीचं मन वळवलं. या वेळेत आरोपी पती आपल्या पत्नी आणि मेव्हणीसह संपर्कात होता. आरोपीनं आपल्या पत्नीला दोन घरं देण्याचं आश्वासन दिलतं. मात्र, मेव्हणी कोमल आणि आरोपी पटेलचं जास्त काळ पटलं नाही. त्यानंतर पत्नीला सोबत घेऊन आरोपी पतीने मेव्हणी कोमलची हत्या केली. यासंदर्भातील वृत्त द टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

थोडक्यात बातम्या –

…तर विराट कोहली ट्रिपल सेंच्युरी मारणार; कपिल देव यांचं मोठं वक्तव्य

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर टीका करणाऱ्या किरीट सोमय्यांवरच गंभीर आरोप

विदर्भातील काँग्रेस मंत्र्याचा घोटाळा बाहेर काढणार- किरीट सोमय्या; सोमय्यांच्या रडारवर आता कोण?

जनता भोळी जरूर आहे पण मुर्ख नाही – चंद्रकांत पाटील

आरसीबीचा ‘वाघ’ एबी डिव्हिलियर्सचं वादळी शतक, गोलंदाजांना भरणार धडकी, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More