बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेता सिद्धार्थची पोस्ट चर्चेत; लाडक्या लेकींसोबत फोटो शेअर करत म्हणाला…

मुंबई |  मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत देखील आपल्या अप्रतिम अभिनयानं सर्वांना आनंद देणारा अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखलं जातं. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर देखील फार सक्रिय असतो. अनेक टेलिव्हिजन शोचा सुत्रसंचालक म्हणून देखील सिद्धार्थनं काम पाहिलं आहे. अशात सिद्धार्थची एक पोस्ट व्हायरल होत आहे.

आयुष्य आनंदानं जगण्याचं एक नाही तर दोन कारणं आहेत. एक म्हणजे इरा आणि दुसरं म्हणजे स्वरा, असं कॅप्शन देत सिद्धार्थनं फोटो शेअर केला आहे. बाप लेकीची मज्जा, बाबा, आपला सिद्धू अशाप्रकारचे टॅग देखील सिद्धार्थनं दिले आहेत. सिद्धार्थच्या लेकी या फोटोत अगदी गोड दिसत आहेत.

सिद्धार्थ हा आपल्या अप्रतिम अभिनयासोबत सडेतोड वक्तव्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. सिद्धार्थनं 10 मे 2007 ला तृप्ती अक्कलवारसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांची जोडी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी मानली जाते. सिद्धार्थनं याअगोदरही अनेकदा लेकींसोबत मज्जा करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

दरम्यान, सिद्धार्थ जाधव सुर्यवंशी चित्रपटात देखील पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता. सध्या सिद्धार्थचे चाहते त्याच्या मराठी सिनेमाची आतुरतेनं वाट पाहात आहेत.

पाहा पोस्ट – 

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

थोडक्यात बातम्या –

‘असल्या बुरसटलेल्या विचारांमुळेच तुमच्या मुलीला…’; राम सातपुतेंचा खडसेंवर हल्लाबोल

गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात गुन्हा दाखल

मनसेचा भोंगा, सेनेला धोका! संजय राऊत म्हणाले, “आमचा अयोध्या कार्यक्रम ठरला”

‘हिमायलात जाईन’ म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांसाठी राष्ट्रवादीकडून तिकीट बूक!

‘देवाचं नाव घेणं जर गुन्हा असेल तर…’; नवनीत राणांचं शिवसैनिकांना सडतोड उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More