Siddharth Jadhav | मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव याची पत्नी तृप्ती अक्कलवारने सोशल मीडियावरून ‘जाधव’ हे आडनाव हटवत माहेरचं ‘अक्कलवार’ आडनाव लावलं आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना तोंड फुटलं. अशात तिनं स्वतः या निर्णयामागचं कारण उघड केलं आहे. (Siddharth Jadhav)
सिद्धार्थच्या एका वाक्यानं घेतला टर्निंग पॉईंट
तृप्ती अक्कलवार (Trupti Akkalwar) ने ‘बातो बातो में’ या कार्यक्रमात बोलताना आपल्या वैयक्तिक आयुष्यातील भावनिक टप्प्यांचा उल्लेख केला. तृप्ती म्हणाली, “2013 मध्ये मी नोकरी सोडली आणि सिद्धार्थच्या (Siddharth Jadhav) कामकाजाकडे लक्ष दिलं. आम्ही मिळून एक बीएचके आणि नंतर दोन बीएचके घर घेतलं. पण 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळात एका भांडणादरम्यान सिद्धू म्हणाला, ‘तुला कोण ओळखतं? सगळे तुला माझ्यामुळे ओळखतात’ हे ऐकून मला खूप लागलं.”
या प्रसंगानंतर तृप्तीने स्वतःची ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. तिनं घर सांभाळत, मुलींच्या जबाबदाऱ्या पेलत व्यवसाय करण्याचा विचार केला.
‘स्वैरा एंटरप्राइजेस’ ते ‘तृप्ती कॉटेज’
तृप्तीनं कोणतीही मदत न घेता, ‘स्वैरा एंटरप्राइजेस’ नावाने स्वतःची कंपनी सुरू केली. तिने साडी विक्रीपासून ते सलोन, प्रदर्शनं आणि शेवटी अलिबागजवळ ‘तृप्ती कॉटेज’ नावाचं होमस्टे सुरू केलं. “मला 19-20 व्या वर्षी बिझनेसवुमन व्हायचं होतं, पण ते स्वप्न त्या वेळी बाजूला ठेवलं होतं. 50 लाखांची गुंतवणूक करून मी हा व्यवसाय सुरू केला, यावर आज कोणी विश्वास ठेवणार नाही,” असं तिनं सांगितलं.
या प्रवासानंतर तिनं ठामपणे ठरवलं की, आपल्या व्यवसायासाठी स्वतःचं ‘तृप्ती अक्कलवार’ हे नाव वापरणार. “माझी खरी ओळख मी विसरू शकत नाही. म्हणून मी माझं माहेरचं आडनाव पुन्हा वापरलं,” असं तिनं स्पष्ट केलं.
सिद्धार्थ जाधवनेदेखील आपल्या इन्स्टाग्रामवर तृप्तीच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत तिचं भरभरून कौतुक केलं आहे. तृप्तीला ‘Strong Woman’ म्हणत सिद्धार्थनं तिच्या जिद्दीला सलाम केला. त्यांनी मे 2007 मध्ये प्रेमविवाह केला होता.
Title : Siddharth Jadhav wife Trupti Akkalwar removed the surname