बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिद्धार्थ शुक्लाला होतं ‘हे’ व्यसन; लंडनला जाऊन घेणार होता उपचार

मुंबई | अभिनेता आणि ‘बिग बाॅस 13’ विजेता सिद्धार्थ शुक्लाने 2 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. ह्रदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच सर्वांना मोठा धक्का बसला. मात्र अद्यापही सिद्धार्थच्या मृत्यूचं ठोस कारण कळलं नाही. सिद्धार्थला एक व्यसन होतं. त्यावर उपचार घेण्यासाठी सिद्धार्थ लंडनला देखील जाणार होता.

बिग बाॅसच्या शोदरम्यान, आपल्या एक्स गर्लफ्रेण्ड सोबत बोलताना सिद्धार्थने आपल्याला प्रचंड सिगरेट ओढण्याचं व्यसन असल्याचं मान्य केलं होतं. यावेळी त्याच्या शेजारी विशाल, आदित्य सिंग बसला होता. आदित्य समोर आपली इच्छा व्यक्त करताना सिद्धार्थने त्याला लंडनला जाऊन लंग्स क्लिनींग ट्रिटमेंट घ्यायची असल्याचं सांगितलं होतं.

अनेक कलाकारांना वेगवेगळे व्यसन असतात. हे व्यसन सोडण्याची इच्छा असल्याने वेगवेगळीकडे जाऊन कलाकार उपचार घेतात. त्याचप्रमाणे सिद्धार्थला देखील लंडनला जाऊन आपल्या फुफ्फुसांमधील काळा कार्बन बाहेर काढायचा होता. मात्र नियतीने वेगळाच खेळ रचला आणि अवघ्या 40 वर्षाचा असतानाचा सिद्धार्थचा मृत्यू झाला.

दरम्यान, सिद्धार्थच्या अकाली मृत्यूने सर्वांना सुन्न केलं आहे. त्याची खास मैत्रिण बिग बाॅस फेम तसेच अभिनेत्री शहनाज गिल हिला देखील मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थ आणि शहनाजची जोडी लोकांना प्रचंड आवडायची. मात्र सिद्धार्थच्या जाण्याने आता ही जोडी पुन्हा कधीच दिसणार नाही.

थोडक्यात बातम्या-

चिमुकल्यासाठी सफाई कामगार ठरला देवदूत; पाहा ‘हा’ थरारक व्हिडीओ

FD करण्याचा विचार करताय?, थांबा, ‘या’ पर्यायांचा विचार करा आणि मालामाल व्हा!

कोव्हिशील्ड लसीच्या दुसऱ्या डोससंदर्भात महत्वाची बातमी; उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली ‘ही’ मोठी मागणी

“उद्धव ठाकरेंसह 12 जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More