बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचा चाहतीला बसला मोठा धक्का! कोमात गेली तरुणी अन्…

मुंबई | अभिनेता तसेच ‘बिग बाॅस 13’ विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी अकाली निधन झालं. ही बातमी समोर येताच सर्वत्र शोककळा पसरली. त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. अशातच सिद्धार्थच्या जाण्याने त्याच्या एका चाहती तरुणीला मोठा धक्का बसला असून ती कोमात गेली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर ही तरुणी धक्क्यात होती. अचानकच ती बाथरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला रुग्णालयात नेलं असता संबंधित तरुणी कोमात गेली असल्याचं समोर आलं आहे. याबाबत स्वतः डाॅक्टरांनी ट्वीट करत ही माहिती शेअर केली आहे. आता या तरुणीवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत सांगताना डाॅक्टरांनी सिद्धार्थच्या चाहत्यांना काळजी घेण्यास सांगत, मन विचलीत न होऊ द्यावं. अशा प्रकारची चिंता करणे हे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं डाॅक्टारांनी म्हटलं आहे. प्रत्येक चाहत्याने आता सावरायला हवं, शांत व्हा, झालेल्या घटनेचा जास्त विचार करु नका, असं देखील त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, सिद्धार्थच्या जाण्याने संपूर्ण बाॅलिवूडला मोठा धक्का बसला आहे. एवढंच काय तर बिग बाॅसमध्ये अभिनेत्री शेहनाज गिल आणि सिद्धार्थच्या जोडीने लोकांना वेड लावून सोडलं होतं. सिद्धार्थच्या जाण्याने शेहनाजची देखील प्रकृती ढासळली होती.

पाहा ट्विट- 

थोडक्यात बातम्या-

तब्बल 21 हजार वर्षापूर्वीही होतं कोरोनाचं अस्तित्व; ऑक्सफोर्डच्या अभ्यासातून धक्कादायक खुलासा

उच्चशिक्षित दाम्पत्यावर आली आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडण्याची वेळ; पाहा नेमकं कारण काय

भारताचं पदक निश्चित! प्रमोद भगतची फायनलमध्ये सुवर्णपदकासाठी लढत

चंद्रकांत पाटलांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; तब्बल 200 कोटी हडपण्याचा रचला कट

निवडणुकीत कोणता पक्ष मारणार बाजी? ‘या’ दोन राज्यात सत्ता बदलाची शक्यता!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More