बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिद्धार्थ शुक्लाची अखेरची खास पोस्ट व्हायरल, जाणून घ्या काय आहे कारण!

मुंबई |  ‘बिग बाॅस 13’ या रिअॅलिटी शोचा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन झालं आहे. त्याच्या जाण्यानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सिद्धार्थचं अशा प्रकारे जाणं प्रत्येकाला धक्का देणारं आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्यावे अखेरचा श्वास घेतला. अशातच सिद्धार्थने केलेली अखेरची पोस्ट व्हायरल झाली आहे.

सिद्धार्थने केलेल्या अखेरच्या पोस्टमध्ये त्याने, जगभर थैमान घातलेल्या कोरोनाच्या लढाईमध्ये कोरोना वॉरिअर्सने केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले होते. पोस्टमध्ये त्याच्या हातात एक पोस्टर असून, #TheHeroesWeOwe असा हॅशटॅग त्याने वापरला आहे.

कोरोनाच्या लढाईत आपला जीव धोक्यात घालून रूग्णांची काळजी घेणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांचे सिद्धार्थने आभार मानले होते. मात्र काळाने घात केला अन् सिद्धार्थला आपल्या कवेत ओढून घेतलं. सिद्धार्थ शुक्ला ट्विटरवर खुप सक्रीय राहत होता. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसोबत तो नेहमी संवाद साधायचा.

दरम्यान,  सिद्धार्थला अचानक ह्रदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. झोपण्याआधी सिद्धार्थने काही औषध देखील घेतली होती. मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

थोडक्यात बातम्या- 

‘…अन् बॉडीबिल्डरचा फुटला बायसेप’; इंजेक्शन घेऊन बायसेप्स फुगवणाऱ्यांनो वेळीच व्हा सावध, पाहा व्हिडीओ

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी आधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी!

“वडेट्टीवार हा जातीयवादी माणूस”; विनायक मेटेंना वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

तालिबान्यांना जूगारून अफगाणिस्ताच्या रणरागिणी उतरल्या मैदानात, केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या!

अखेर तालिबानचं ठरलं! नव्या सरकारमध्ये तालिबान्यांनी केली ‘या’ नेत्याची निवड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More