बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मृत्यूच्या 6 दिवस आधी सिद्धार्थनं केलं होतं मोठं काम, तुम्हालाही अभिमान वाटेल!

मुंबई | ‘बिग बॉस 13 व्या शो’चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनयाच्या जोरावर शुक्लाने कमी वेळेत लोकांच्या मनात घर केलं होतं. या काही दिवसात सिद्धार्थ आयुष्यातील कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर होता. सिद्धार्थ शुक्ला काळाच्या पडद्याआड गेला असला तरी मृत्यूच्या 6 दिवस आधी त्याने केलेलं काम सगळ्यांच्या लक्षात राहणारं आहे.

सिद्धार्थ काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांसाठी मोहीम राबवत होता. त्यावेळी सिद्धार्थ प्राण्यांच्या जेवणाची पूर्ण व्यवस्था करत होता, असं आसीम बामला या व्यक्तीने सांगितलं आहे. सिद्धार्थाने बामला या व्यक्तीला ही माहिती 27 ऑगस्ट रोजी दिली होती.

सिद्धार्थने भटक्या कुत्र्यांसाठी राबवत असलेल्या मोहीमबाबत एक ट्विट केलं होतं. त्या ट्विट बामला या व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर करत सिद्धार्थाचे आभार मानले होते. त्यानंतर त्या ट्विटला सिद्धार्थाने लगेचच प्रतिसाद देत, असे एक जग आहे, तिथे मानवी जीवन इतके स्वस्त झाले आहे.. ते पाहणे आनंददायी आहे. भटक्या कुत्र्यांवर दया करा, असं सिद्धार्थाने म्हटलं होतं.

दरम्यान, सिद्धार्थ शुक्ला ट्विटरवर खुप सक्रीय राहत होता. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसोबत तो नेहमी संवाद साधत असे. त्यामुळे त्याच्या भोवती चाहत्यांची प्रचंड गर्दी जमा होत होती. मात्र त्याच्या अचानक जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

सिद्धार्थला रुग्णालयात आणलं तेव्हा काय झालं?, हॅास्पिटलकडून मोठी माहिती

अभिनेता सिद्धार्श शुक्ला आपल्या मागे सोडून गेलाय ‘इतक्या’ कोटींची संपत्ती!

सुशांतच्या मृत्यूशी सिद्धार्थच्या मृत्यूला का जोडलं जातंय?, सुरु आहे मोठी चर्चा

व्हॅाट्सॲपवरुन ओळख, मैत्री, प्रेम अन्… अक्षय बोराडेविरोधात पत्नीनं दाखल केला गुन्हा

शहनाजवर आभाळ कोसळलं, वडिलांनी दिली मुलीच्या प्रकृत्तीबद्दल मोठी माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More