बिश्नोई गँगकडून सिद्दीकींच्या हत्येचा खुलासा, ‘त्या’ पोस्टमुळे एकच खळबळ

Baba Siddique | माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये गोळीबार करण्यात आला. या घटनेमध्ये बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला.  या प्रकरणात आता एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत.

बाबा सिद्दीकींच्या (Baba Siddique) हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत बिश्नोऊ गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

बिश्नोई गँगकडून एक फेसबूक पोस्ट करण्यात आली आहे. ‘ओम् जय श्री राम, जय भारत… जीवनाचं मुल्य मला माहिती आहे. ‘मी शरीर आणि पैसा धूळ मानतो. मी पाळलेलं ते सत्कर्म होतं, ते मैत्रीचं कर्तव्य होतं,’ अशी पोस्टची सुरूवात करण्यात आली.

बिश्नोई गँगने पुढे पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘सलमान खान आम्हाला हे युद्ध नको होतं. पण तू आमच्या भाईचं आज नुकसान केलं आहे. आज जे बाबा सिद्दीकींच्या प्रामाणिकपणाचं गुणगान गात आहेत एकेकाळी दाऊद मकोका प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात होता. सिद्दीकी यांच्या मृत्यूचं कारण म्हणजे अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणं.

Bishnoi gang

महत्त्वाच्या बातम्या- 

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानचा मोठा निर्णय!

बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती समोर!

बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांची चौकशीत अत्यंत धक्कादायक कबुली!

बाबा सिद्दीकींच्या हत्ये मागे या गँगचा हाथ? माहिती समोर येताच सगळीकडे खळबळ

सिद्दीकींना गोळी मारण्यामागचं धक्कादायक कारण समोर