Side effects of apple | बाजारात सध्या सफरचंद विकायला आली आहेत. रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरपासून दूर राहा, असं म्हटलं जातं. पण, ही गोष्ट प्रत्येकालाच लागू होईल, असं नाही. काही लोकांनी सफरचंदाचे सेवन सावधगिरीने करावे. सफरचंदात असलेले व्हिटॅमिन, फायबर, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. मात्र, सफरचंद सेवनाने सर्वांनाच फायदा होत नाही. (Side effects of apple)
सफरचंद कुणी खाऊ नये?
ॲलर्जी : बऱ्याच जणांना सफरचंद खाण्याची ॲलर्जी असू शकते. अशा लोकांना सफरचंद खाल्ल्यानंतर त्वचेवर खाज सुटणे, पुरळ येणे आणि सूज येण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना यायची ॲलर्जी असेल त्यांनी हे फळ चुकूनही खाऊ नये.
लठ्ठपणा : सफरचंदमध्ये जास्त प्रमाणात कॅलरी आणि साखरेचे प्रमाण असल्याने वजन अधिक वाढू शकते. त्यामुळे जे व्यक्ती वजन कमी करत असतील, त्यांनी सफरचंद खाऊ (Side effects of apple) नये.
अतिसार : ज्यांना अतिसार झाला असेल त्यांनी देखील सफरचंद खाऊ नये. सफरचंदात असलेले फायबर आताड्याची हालचाल वाढवते. त्यामुळे सफरचंदाचे जास्त सेवन केल्याने डायरिया म्हणजेच अतिसारची समस्या अजून वाढू शकते. याचा अधिक त्रास होण्याची शक्यता असते.
मधुमेह : ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी (Side effects of apple) सफरचंद खाऊ नये. सफरचंदांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणखी वाढते.
दातांच्या आरोग्यासाठी घातक : तुम्हाला पांढरे शुभ्र आणि निरोगी दात हवे असतील, तर सफरचंदचे (Apple Side Effects) अधिक सेवन करणं आताच थांबवा. कारण, सफरचंद सोड्यापेक्षा जास्त अम्लीय असते. त्यामुळे ते मागच्या दातांनी खावं असं डॉक्टर म्हणत असतात. अशात सफरचंद जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या दातांना इजा होऊ शकते.
दिवसाला किती सफरचंद खावे?
तुम्ही दिवसाला एक किंवा जास्तीत जास्त दोन सफरचंद खायला पाहिजे. यापेक्षा अधिकचं सेवन घातक ठरू शकतं. अधिकचं सफरचंद खाल्ल्याने वजन वाढू शकतं आणि अधिकचं वजन म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण असतं. त्यामुळे दिवसाला एक सफरचंद शरीरासाठी पुरे ठरतं.
News Title- Side effects of apple
महत्त्वाच्या बातम्या –
“फडणवीसांच्या घाणेरड्या राजकारणाचा अंत जवळ”; संजय राऊतांची भविष्यवाणी
धोनीसाठी कायपण! CSK ला लवकरच मिळणार खुशखबर?
पाऊस पुन्हा परतला! आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार, यलो अलर्ट जारी
SBI ने करोडो ग्राहकांना दिला झटका, आता तुमचा EMI वाढणार?
iPhone 15 वर मिळतंय तब्बल 9 हजारांचं डिस्काउंट; जाणून घ्या ऑफरबद्दल