घट्ट जीन्स पँट घालत असाल तर थांबा, ‘हे’ दुष्परिणाम एकदा वाचा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | काळ बदलत गेला तशी काळानुसार फॅशन (Fashion) पण बदलत गेली. आजकाल टाईट जीन्स पँटची चलती असून महिला अगदी रोज टाईट जीन्स वापरतात. दिसायला ही जीन्स कितीही स्टाईलिश दिसत असली तरी त्याचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम आहेत. (Side Effects Of Tight Jeans)

जीन्स प्रत्येक लूकवर उठून दिसते. मात्र, दिर्घकाळ टाईट फिटींग जीन्स परिधान केली तर त्यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात ज्याचे परिणाम भविष्यात जाणवतात.

टाईट फिटींग जीन्समुळे पोटाच्या आणि कमरेच्या खालचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. टाईट जीन्समुळे हाडे आणि सांध्यांच्या हालचालीत अडचण येऊन पाठ, कंबर आणि पाय दुखण्याची पण भीती असते.

टाईट जीन्समुळे आजकाल मुलींना लहान वयातच गर्भाशयाच्या संसर्गाचा त्रास होत आहे. वेळेवर उपचार झाले नाहीत तर नळीमध्ये कायमस्वरूपी अडथळा निर्माण होऊन आई होण्यात अडचण येऊ शकते.

जीन्स पँटचा कपडा जाड असतो त्यामुळे त्वचेपर्यंत हवा पोहचत नाही. म्हणून जास्त वेळ जीन्स परिधान केली तर त्यामुळे त्वचेला घाम येऊन खाज सुटू शकते.

दरम्यान, टाईट जीन्स पँटमुळे ओटीपोटावर दबाव येतो आणि त्यामुळे रक्तप्रवाह मंदावतोच पण पोटही दुखू शकतं.

महत्त्वाच्या बातम्या-