बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लहान मुलांच्या लसीकरणानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे; तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून लहान मुलांच्या लसीबाबत देशात चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लहान मुलांच्या लसीसंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका अधिक आहे, अस तज्ज्ञांकडून सांगितलं जातयं. आता लसीचा पुरवठा नियमित व्हावा, टंचाई जाणवू नये म्हणून लहान मुलांच्या वयोगटानुसार लसीकरण विभागले आहे.

कोरोनाचे नवनविन व्हेरिएंट लहानग्यांना देखील संक्रमित करतील असं सांगितल जात होतं. थोड्याप्रमाणात हे सत्य असल्याचं दिसतयं. आता लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने लस देण्याची तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्यात भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस येणार आहे. त्यामुळे आता 2 ते 18 वर्षाच्या मुलांच लसीकरण करता येणार आहे.

जेव्हा कोरोना प्रतिबंधक लस दिली जाते त्यावेळेस काही साईड इफेक्टही जाणवू लागतात. अंगदुखी, थकवा, ताप यांसारखी लक्षणे जाणवू लागतात. परंतु मुलांच वय जर दोन ते पाच वर्षे असेल तर मुलाला काय त्रास होत आहे हे सांगता येणार नाही. यावर घाबरून न जाता डॉक्टरांनी दिलेली औषधे देऊन योग्य आरामाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

दरम्यान, लहान मुलांच लसीकरण दोन ते तीन वयोगटात करण्यात येणार येईल, अशी शक्यता आहे. लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी केल्यानंतर फ्लु सारखी लक्षणे दिसत आहेत, जी लक्षणे अपेक्षित आहेत. ही लक्षण कोरोना लसीचा प्रभाव मानली जातात. लहान मुलाला लस दिल्यानंतर जर काही लक्षणे दिसली तर डॉक्टरांशी सल्ला घेण्याची गरज आहे. तुम्ही निर्णय घेऊन आणि कुठलीही चौकशी केल्याशिवाय मुलांना लस देऊ नये, असं सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

आर्यन खानला फक्त हिंदू-मुस्लीम वादासाठीच अटक केली – नाना पटोले

वर्ल्ड चॅम्पियन! डीजे ब्रावोच्या गाण्यावर थिरकले कॅरेबियन खेळाडू; पाहा व्हिडीओ

“कदाचित गांज्याची नशा उतरली नसल्यानं संजय राऊत…”

“समीर वानखेडेचा बाप बोगस होता, तुला तुरूंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही”

पुण्यातील बँकेवर फिल्मी स्टाईल दरोडा, घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More