Sidharth Malhotra | अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सिद्धार्थचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ मॉडेलसोबत दिसत आहे. हा व्हिडीओ एका रॅम्प शो मधील आहे. यात असलेली मॉडेल सिद्धार्थच्या जवळ जाताना दिसली.
व्हिडिओमध्ये, मॉडेल सिद्धार्थला (Sidharth Malhotra) त्याच्या कोटने ओढताना दिसत आहे. ती त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करते आणि मग तिचे हात त्याच्या गळ्यात घालते आणि त्याला चिकटून राहू लागते.
सिद्धार्थ मल्होत्राचा व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. काही लोकांनी सिद्धार्थला कियाराची आठवण करून दिली तर काहींनी तो अस्वस्थ दिसत असल्याचे सांगितले. एका यूजरने लिहिलं की कियारा भाभी, मला हे सहन झाले नसते. त्याचवेळी दुसऱ्याने लिहिलं की, सिद्धार्थ भाई, जर तुम्हाला घरी जायचं असेल तर जरा जपून राहा.
दरम्यान, आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉडेलने त्याची पत्नी कियारा अडवाणीची माफी मागितली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सिद्घार्थसोबत मॉडेल एलिसिया कौर आहे.
Sidharth Malhotra | मॉडेलने मागितली माफी
मॉडेल एलिसिया कौरने रॅम्पवरील व्हिडीओ शेअर करत तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, सॉरी कियारा, असं लिहिलं आहे. पुढच्या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे, “हे आमचं काम आहे.”
या व्हिडिओवर युजर्सकडून अनेक कमेंट येत आहेत. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट करत म्हटलंय, सिद्धार्थ कियारा चप्पल घेऊन तुझी वाट पाहत असेल. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉडेलने सिद्धार्थची पत्नी कियाराची माफीही मागितली आहे.
sidharth malhotra in black?!?!? he looks absolutely stunning, FINE AS HECK pic.twitter.com/9W8AE19YsK
— 𝒘. 🤍 (@omgwashhh) August 9, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ साठी मंत्री अदिती तटकरे मैदानात, पुण्यात जंगी कार्यक्रम
‘स्क्रीनवर आपले कपडे काढून…’; Aishwarya Rai चा सर्वात मोठा खुलासा
राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
“माझ्या त्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत”, प्राजक्ता माळीचा सर्वात मोठा खुलासा!
राहासोबत रणबीर कपूरच्या सासूने केलं असं काही… सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल!