Sidhharth Jadhav | मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. यामुळे मुंबईकर आणि मुंबईच्या उपनगरातील काही सखल भागात पाणी साचलं आहे. अशा स्थितीत महापालिकेचे कर्मचारी आपली भूमिका बजावत आहेत. तसेच रस्त्यावर भरलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी नाहक त्रास होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई पोलीस नागरिकांची मदत करताना दिसत आहेत.
मुंबई पोलिसांना सिद्धार्थ जाधवचा सलाम
मुंबई पोलिसांचं काम पाहता आता मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Sidhharth Jadhav) देखील भारावून गेला आहे. भर पावसात मुंबई वाहतूक पोलीस काम करत आहेत. त्यांच्या कार्याला सिद्धार्थ जाधवने (Sidhharth Jadhav) सलाम केला आहे. सिद्धार्थ जाधव (Sidhharth Jadhav) आणि मुंबई वाहतूक पोलिसांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
रस्त्यात बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वेरूळावर देखील पाणी साचलं आहे. हर्बर लाईन बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता चाकरमान्यांचे हाल होताना दिसतात. ऑन ड्युटी पोलिसांसोबत सिद्धार्थने वेळ घालवला आहे. मुंबईतील गिरगाव चौपटीवरील सिद्धार्थचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
सिद्धार्थने पोलिसांसोबत सेल्फी घेतानाचा व्हिडीओ व्हायरल
सिद्धार्थने पोलिसांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो त्याने सोशल मीडियावर स्टोरी ठेवली होती. त्याने सिंबाचं गाणं ठेवलं होतं. यातून सिद्धार्थची सामाजिक बांधिलकी दिसून आली आहे. मुंबईत मुसळधार पावसात सेवेत तडजोड न करता भिजत उभे राहून कर्तव्य पार पाडणाऱ्या मुंबई पोलिसांचे सिद्धार्थने आभार मानले आहेत.
View this post on Instagram
सिद्धार्थ जाधवची (Sidhharth Jadhav) समाजाप्रती असलेली भावना पाहून अनेक चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. सिद्धार्थ जाधवच्या आगामी सिनेमाबाबत सांगायचं झाल्यास सिद्धार्थ जाधव लवकरच ‘नवरा माझा नवसाचा 2’ या सिनेमात काम करणार आहे. ‘येरे येरे पैसा 3’ या सिनेमात काम करताना दिसणार आहे. त्याच्या मटका किंग या सिनेमाची जोरदार चर्चा आहे.
News Title – Sidhharth Jadhav Selfie With On Duty Mumbai Police In Mumbai Rain
महत्त्वाच्या बातम्या
‘अशा’ व्यक्तींपासून होईल तितकं दूर राहा; आयुष्यात सुख-समृद्धी चालून येईल
“खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत?”;जितेंद्र आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत
मोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची मान्यता
कोट्यावधींचे 24 भव्य आश्रम, महागड्या गाड्या; भोलेबाबाची एकूण संपत्ती किती?
मोठी बातमी! ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी