मराठी भाषा, शाळांच्या संवर्धनासाठी डोंबिवलीकरांची विशेष मोहीम

डोंबिवलीत मराठीच्या संवर्धनासाठी सह्या करताना नागरिक

डोंबिवली | मराठी भाषा आणि मराठी शाळांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र दिनी डोंबिवलीत सह्यांची मोहीम राबवण्यात आली. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे यासाठी पुढाकार घेतला. हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सह्या करुन या मोहिमेला पाठिंबा दिला. या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र सरकारी पातळीवरुनही यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानची मागणी आहे. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या