बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

पुणे |  भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुण्यात देखील धुमाकूळ घातला होता. पुणे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. मात्र, याच पुण्यात आता कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 287 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 228 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 10 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये 05 जण पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 227 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,81,834 इतकी आहे. तर पुण्यात 3085 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8652 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,70,097 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही रूग्णसंख्या घटली.

थोडक्यात बातम्या- 

“शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा”

कोरोनामुक्त गाव करणाऱ्या ग्रामपंचायतींना देणार पुरस्कार

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांंदीचे भाव उतरले; वाचा ताजे दर

“नितेश राणेंकडे असलेली प्रगल्भता दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही”

धक्कादायक! लसीकरण करण्यासाठी नेलं अन् नसबंदी करुन आणलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More