बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

पुणे | भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुण्यात देखील धुमाकूळ घातला होता. पुणे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. मात्र, याच पुण्यात आता कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 334 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 212 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 10 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये 04 जण पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 225 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,82,916 इतकी आहे. तर पुण्यात 3033 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8674 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,71,209 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही रूग्णसंख्या घटली.

थोडक्यात बातम्या-  

मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

‘वडिलांप्रमाणे भूमिका निभावली म्हणून ते लोकप्रिय ठरले’; पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक!

‘माझ्याकडे पुरेसे पैसे नसल्यानं मी मुलाला लाॅंन्च केलं नाही’, ‘या’ अभिनेत्यानं केला खुलासा

‘एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोक चव्हाणांचे आंदोलन’; संभाजीराजे आक्रमक

“राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शरद पवार रिमोट कंट्रोल”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More