बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र पुण्यात आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. तसेच दररोजच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 2025 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 4825 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 74 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 24 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1401 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,46,564 इतकी आहे. तर पुण्यात सध्या 33,732 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एकूण 7,358 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,05,474 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 13107 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: विस्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-  

“कोरोनाच्या चितेत लोक जळत होते, तेव्हा पंतप्रधान प्रचारात मग्न होते”

“राऊत कोणाच्या सांगण्यावरून भाजपवर टीका करतात, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो”

‘कोरोना काळात राजकारण करू नका, पक्ष विसरून मदत करा’; गडकरींनी टोचले भाजप कार्यकर्त्यांचे कान

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याचा लॉकडाऊन आणखी वाढवला

मालदीवमध्ये दारु पिऊन वॅार्नर आणि स्टेलर यांच्यात जोरदार हाणामारी?, स्टेलरनं दिलं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More