बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ, लवकरच 50 हजारापार जाण्याची शक्यता

पुणे | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कौल असतो. त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं. भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेले दोन दिवस सोन्याच्या दरात सातत्याने घट होताना पाहायला मिळत होती. मात्र, आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रती तोळ्यामागे 250 रुपयांची वाढ झाली आहे. 250 रुपयांच्या वाढीसह आज पुण्यात सोन्याचा दर 49 हजार 450 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला आहे. सोन्याचे वाढते भाव पाहता सोनं लवकरच 50 हजार रुपये प्रती तोळ्याच्या पार जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरात देखील  मोठी वाढ झाली आहे. आज प्रती किलो चांदीमागे 500 रुपयांची वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार आज पुण्यात चांदी 67 हजार 400 रुपये प्रती किलो होती.

दरम्यान, मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या – 

नागरिकांनो सावधान! देशात पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढतोय

‘टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान भारताला हरवणार’; शोएब अख्तर पुन्हा बरळला

“न्यूड ऑडिशनला नकार दिल्यानं मला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती”

ब्रेकिंग! पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पेट्रोल, डिझेल न देण्याचा निर्णय

कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर, सांगलीतील ‘या’ गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More