राजद्रोहाच्या खटल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!
नवी दिल्ली | राज्यासह देशभरात गाजत असलेल्या राजद्रोह कायद्यावर आता सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राजद्रोह कायद्याचं कलम सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरतं रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
राजद्रोह कायद्याबाबत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात फेरविचार करण्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर फेरविचार होईपर्यंत कलम 114 अ नूसार राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात येऊ नये, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
सदरिल कायद्याअंतर्गत प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याबाबत सरकारकडून प्रयत्न करण्यात यावेत असं देखील न्यायालयानं म्हटलं आहे. परिणामी आता सरकार जोपर्यंत राजद्रोहाच्या प्रकरणाबाबत ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत नवीन राजद्रोहाचा खटला दाखल करता येणार नाही.
दरम्यान, राज्यात तसेच देशात मोठ्या राजद्रोहांच्या खटल्यांची सातत्यानं चर्चा होत असते. नुकतंच महाविकास आघाडी सरकार आणि राणा दाम्पत्यामध्ये देखील राजद्रोहाच्या खटल्यावरून जोरदार वाद झाला होता.
थोडक्यात बातम्या –
सोमय्यांना आणखी एक झटका; राऊतांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
पेट्रोल-डिझेलच्या दरात आज काय बदललं?, वाचा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर
‘राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून…’; नाना पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ
“राज ठाकरे इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं”
‘…तर लोकांनी शरद पवारांना डोक्यावर घेतलं असतं’, निलेश राणेंची बोचरी टीका
Comments are closed.