Top News देश

देशात कोरोना साथीचा वाईट काळ सरल्याची चिन्हे- केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली | देशात कोरोना साथीचा वाईट काळ सरला असल्याची चिन्हे आहेत. मात्र, तरीही अतिशय सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.

हर्षवर्धन म्हणाले की, “गेल्या तीन-चार महिन्यांपासून भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. असे असले तरी मास्क वापरणे, हात सतत धुणे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे आदि. कोरोना साथीला नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकारने बनविलेले हे नियम जनतेने यापुढेही पाळायला हवेत.”

देशात दररोज वीस हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतामध्ये 95.53 टक्के आहे. त्या तुलनेत रशिया, अमेरिका, ब्राझीलसारख्या विकसित देशांमध्ये मात्र कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतापेक्षा कमी म्हणजे 60 ते 70 टक्के आहे.

दरम्यान, कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला येत्या जानेवारी महिन्यातील कोणत्याही आठवड्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. हे माझे वैयक्तिक मत असल्याचं हर्षवर्धन म्हणाले. तसेच जनतेला देण्यात येणारी कोरोना लस परिणामकारक व सुरक्षित असावी, यावर केंद्र सरकारचा कटाक्ष आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…त्या वेळी तुम्ही काय करणार? कुठं तोंड लपविणार?’; गुरूवाणीचा अर्थ सांगत मोदींवर निशाणा

“कोरोनाने सांगितलं आहे का मी दिवसा झोपेल आणि रात्री बाहेर येईल”

…तर ‘त्या’ खाजगी प्रयोगशाळांची मान्यता होणार रद्द- महापौर

कोरोना विषाणूचे दुष्परिणाम वाढले; ‘या’ रूग्णांनी काळजी घ्यावी

‘केंद्राचं पथक आत्ता राज्यात म्हणजे ‘पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं’; रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या