“स्वत:च्या लेकरावर हात ठेवून सांगावं, की त्यांनी…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा नांदेडच्या शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) पटकावली. त्याने अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडचा पराभव केला. या लढतीआधी महेंद्र आणि सिकंदर शेख (Sikandar Shaikh) यांच्यात झालेल्या कुस्तीची चर्चा जोरदार होत आहे. यात महेंद्र गायकवाडला दिलेल्या गुणांवरून पंचांसह आयोजकांवर आरोप केले जात आहेत.

सध्या सोशल मीडियावर याबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. आता सिकंदर शेखचे वडिल रशीद शेख यांनी या निकालावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

कुठल्याही गरीबावर अन्याय होऊ नये. कुस्ती भरवणाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. पण ज्यांनी चूक केली, चार पॉइंट दिले त्यांनी, स्वत:च्या लेकरावर हात ठेवून सांगावं, की त्यांनी चुकीचा निर्णय दिला की, योग्य निर्णय दिला?, असा सवाल सिकंदरच्या वडिलांनी केलाय.

मी गरीबी अनुभवली आहे. मी गरीबीतून मुलाला पैलवान म्हणून घडवलं. मी हमालीच काम करायचो. पैशांची चणचण होती. पण मुलाला पैलवान म्हणून घडवण्यासाठी कष्ट केलं, असं त्यांनी सांगितलं.

बारावीपर्यंत इथे शिकवलं. पैलवानीचे धडे दिले. त्यानंतर कोल्हापूरला पाठवलं. फार पैसे नव्हते, तेव्हा काही हितचिंतक पाठिशी उभे राहिले. त्यांनी मदत केली. सिकंदरने नाव कमावलं. पंजाब, हरयाणात सामने जिंकले, असं रशीद शेख म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-