बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नांदेडमध्ये तलवारी उगारत शीख समुदायाची मिरवणूक, पोलिसांवर केला हल्ला

नांदेड | महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काही जिल्ह्यांमध्ये लाॅकडाऊन करण्यात आला आहे. तर सार्वजनिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमावर देखील बंदी घालण्यात आली आहे. मात्र नांदेडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत शीख समुदयाने जंगी मिरवणूक काढली. एवढंच नाही तर विरोध करणाऱ्या पोलिसांवर तलवारीने हल्ले सुद्धा करण्यात आले आहेत.

लाॅकडाऊन असल्यामुळे शीख समुदयाच्या ‘हल्लाबोल मिरवणूकला’ पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरी देखील सोमवारी संध्याकाळी 5च्या सुमारास भाविक गुरूद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्यानंतर नियोजित पद्धतीने मिरवणुक काढायचं ठरलं. पण पोलिसांची परवानगी नसल्यानं गुरूद्वारा चौकात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले. रस्त्यावर चौपदरी बॅरिकेटींग करण्यात आली होती. काही वेळाने मिरवणूकीला सुरूवात झाली.

पोलिसांनी अडवल्यानंतर भाविकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर लावलेली बॅरेकेडींंग भाविकांनी तोडली. सुमारे 400-500 संतप्त जमावाने तलवारी उगारल्याने पोलिसांना त्या ठिकाणाहून पळ काढावा लागला. 4 पोलिसांना तलवारीचा मार बसल्याने ते जखमी झाले. तर भाविकांनी नंतर पारंपारिक पद्धतीने हल्लाबोल मिरवणूक काढली.

दरम्यान, या गोंधळात 10 हून अधिक पोलिसांना दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबत संतप्त जमावाने पोलीस उपअधिक्षकांची गाडी देखील फोडल्याचं कळत आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असुन गुन्हे दाखल करण्याची प्रकिया चालू आहे. ‘घडलेली घटना निंदनीय आहे. पोलीस कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहे’, असं खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं म्हणणं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाची लागण!

‘…तर मग लॉकडाऊन कराच’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर हरभजनसिंग आक्रमक

‘उद्धवजी, समस्या ही आहे की…’; लॉकडाऊनवरून आनंद महिंद्रांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

जाणुन घ्या… महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मनाला सुन्न करणारा व्हिडीओ! बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून काढली धिंड, मातोंडकरही भडकल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More