बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुंबई क्रुझ प्रकरण पुर्णपणे खोटं, शाहरूख खान त्यांच्या निशाण्यावर’; शत्रुघ्न सिन्हा संतापले

मुंबई | मुंबईहून गोव्याला निघालेल्या कार्डेलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकला होता. एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याच्या अन्य आठ साथीदारांना एनसीबीने ताब्यात घेतललं आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचासह अन्य जणांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. शाहरूख खान आणि त्याच्या कुटूंबियांना आता बॉलिवूडमधून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

अभिनेते आणि राजकारणी असलेले शत्रुघ्न सिन्हा यांनीही आता मुंबई ड्रग्स प्रकरणावर प्रतिक्रिया देत शंका उपस्थित केली आहे. कार्डेलिया क्रुझ प्रकरणामध्ये अनेक गोष्टी या अतिशयोक्तीपूर्ण आहेत. तसेच काही गोष्टी जास्तच रंगवून सांगितल्या आहेत, असं सिन्हा म्हणाले आहेत.

बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण जसं सांगितलं जात आहे, तशी परिस्थिती नाही. मुद्रा बंदरावर मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडले आहेत, अशी चर्चा असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच मुंबई क्रुझ प्रकरणात शाहरूख खान निशाण्यावर असू शकतो, असं सिन्हांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मला वाटतं की मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरण हे पुर्णत: हा खोटं आहे. तसेच आर्यनकडून कोणतेही ड्रग्स जप्त करण्यात आले नाहीत. त्याची रक्त आणि लघवी तपासणी करण्यात आलेली नाही. तसेच या अटकेमध्ये काही पक्षांचे लोक देखील सामील होते. त्यामुळं नवाब मलिकांनी केलेले आरोप हे विचार करण्यासारखे आहेत, असं सिन्हा यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘…तर कर्णधारपदावर राहण्याचा मला काहीच हक्क नाही’; अखेर विराटने सोडलं मौन

देशातील अशिक्षित नागरिक देशावरील ओझं आहेत – अमित शहा

“लखीमपूरसारखी कोणाकडे जीप असेल तर, त्यांनी बाहेर काढून दाखवावी”

…म्हणून ‘त्या’ निर्णयाला अजित पवारांचा विरोध; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

“मला पक्षातून काढण्याची कोणाचीही हिंमत नाही, ही केवळ राजकीय लढाई”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More