बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मूक आंदोलन सुरुच राहणार, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही – संभाजीराजे भोसले

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काल कोल्हापुरात पहिलं मूक आंदोलन करण्यात आलं होतं. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण आदींच्या उपस्थितीत संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत चर्चा केली.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे. 21 जून रोजी नाशिकमध्ये पुढील निर्णय घेतला जाईल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापूरला काल आमचा पहिलं मूक आंदोलन आम्ही सुरू केलं. असं 36 जिल्ह्यांत मूक आंदोलन करण्याचा मानस आहे. पण सरकारने ताबडतोब त्याची दखल घेतली. त्यामुळे आम्ही बैठकीसाठी इथे आलो. येत्या 21 जून रोजी नाशिकमध्ये मूक आंदोलन नियोजित आहे. पण तिथे राज्यातील सर्व समन्वयक आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असं संभाजीराजे यावेळी म्हणाले.

बैठकीत घेतलेले निर्णय – 

मूक आंदोलन मागे घेणार नाही; सरकारशी चर्चा सुरुच राहिल

येत्या गुरुवारी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी सरकारकडून तत्त्वत: मान्यता

वसतीगृहाच्या मुद्यांबाबत 36 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांमधल्या वसतीगृहांसाठी सरकारकडून पैसे देण्यास मान्यता

शनिवारी सारथीबाबत अजित पवार बैठक घेणार

अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज उपलब्ध करुन देण्यातल्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन,

सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये समन्वयक समिती स्थापन करणार

थोडक्यात बातम्या – 

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

लेडी बाहुबली! 37व्या वर्षीही महिलेचा साडीत जबरदस्त वर्कआऊट

चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात लहान मुले कोरोनाबाधित होण्याचं प्रमाण झपाट्याने वाढलं

मास्क न घालणाऱ्यांना झेडपी तिकीट नाही- सुप्रिया सुळे

‘100 कोटी घ्या अन् भाजपला विरोध करा’; आप आणि काँग्रेसची ‘या’ संताला ऑफर???

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More