बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! दात घासतानाही लठ्ठपणा कमी करता येणार?, वाचा सविस्तर

मुंबई | आजकाल सर्वांचच जीवन हे धावपळीचं झालं आहे. नोकरी, व्यवसाय यातून वेळ काढून व्यायामाला वेळ देणं अनेकांना जमत नाही. त्यामुळे शरीराची काही हालचाल होत नाही आणि वजन वाढते. पण हा लठ्ठपणा अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतो. म्हणूनच वाढलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी ब्रश (Brush) करताना काही व्यायाम करून वजन (Weight) नियंत्रणात ठेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणते व्यायाम आहेत जे तुम्ही ब्रश करताना करू शकता.

सिटअप्स हा व्ययाम करुन तुम्ही पोटावरील चरबी कमी करु शकता. हा व्यायाम तुम्हाला केवळ पाच मिनिटे करायचा आहे. म्हणूनच ब्रश करता करता तुम्ही हा व्यायाम सहज करू शकता, तसेच लंजेज हा व्यायाम केल्याने तुमच्या पोटावरील आणि मांडीवरील फॅट कमी होतो.  त्यामुळे हा व्यायाम देखील तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. साइड स्ट्रेच केल्याने तुमच्या हातावरील चरबी कमी होते. हे सर्व व्यायाम तुम्ही ब्रश करताना करू शकता. हे व्यायाम  तुम्ही रोज केल्याने नक्कीच तुमच वजन कमी होईल.

व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते. व्यायामाने केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचे आयुमान वाढते. तसेच शरीराची कार्यक्षमता देखील वाढते. शिवाय त्वचा देखील चांगली राहते.

दरम्यान, वेळ नसेल तरीही दात घासताना वर सांगितलेले व्यायाम करून तुम्ही वजन कमी करू शकता. तसेच वजन वाढू नये यासाठीही तुम्ही हे व्यायाम करा.

थोडक्यात बातम्या-

दौपदी मुर्मूंवरील ‘त्या’ टीकेमुळे भारती पवार संतापल्या, म्हणाल्या…

राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

‘… नाहीतर आम्ही एकमेकांचा जीव घेतला असता’, नागा चैत्यन्यसोबतच्या घटस्फोटावर समंथा स्पष्टच बोलली

जम्बो कोविड सेंटरबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

‘…त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायची का?’, सुहास कांदेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More