बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोटावरची चरबी कमी करायचीय? मग ‘या’ 5 सवयी लावून घ्याच

मुंबई | कुठल्याही वयातील व्यक्ती असो, स्लीम बाॅडी ही आजच्या काळात प्रत्येकाचीच इच्छा असते. बदलत्या जीवनशैलीचा (Changes in Lifestyle) परिणाम आरोग्यावर होत असल्याचं सध्या दिसत आहे. पोटावरची चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी आजकाल पैसा पाण्यासारखा ओतला जात आहे. खर्चिक उपाय करण्यापेक्षा काही सवयीत बदल केला तर पोटावरची चरबी झपाट्याने कमी होऊ शकते.

खाण्या-पिण्याच्या काही नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर पोटावरील चरबी आणि तुमचं वजनही नियंत्रणात राहिल. धकाधकीच्या आयुष्यात आपल्या एकाच वेळी अनेक कामं करण्याची सवय झाली आहे पण जेवण करताना टीव्ही आणि मोबाईल बघत जेवण करू नका, यामुळे जास्त वेळ वाया जातोच शिवाय जास्तीच्या कॅलरिजही तुम्ही घेता ज्यामुळे वजन वाढतं.

रात्रीच्या जेवणानंतर काहीही खाऊ नका आणि निर्धारीत कॅलरीजच घ्या ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहातं. झपाट्याने चरबी कमी करण्याचा नादात जेवण चुकवू नका आणि अॅसिडिटीचा त्रास असेल तर मुळीच नाही. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि नंतरही जास्त जेवण केलं जातं.

जेवणात हलक्या आहाराचा समावेश करावा. रात्रीचं जेवण कमी घेतलं तर पचनक्रियाही व्यवस्थित होते. तर दोन जेवणांच्या मध्ये मध्ये काहीतरी निरोगी स्नॅक्सचं सेवन करावं. यामुळे जास्त जेवण जात नाही, चयापचय व्यवस्थित होतं आणि पोट सुटण्यावर नियंत्रण राहातं.

थोडक्यात बातम्या-

“ते एक बंद षडयंत्रच होतं”, मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट

“उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहणार असल्याची चर्चा म्हणजे…”

“मी पवार साहेबांवर प्रेम केलं, मी त्यांचा माणूस असं…”

“उत्पादन वाढवा मार्केट निर्माण करण्याची जबाबदारी माझी”, गडकरींचं शेतकऱ्यांना आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More