बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उस्मानाबादेत एकाच वेळी 23 जणांवर अंत्यसंस्कार; हृदय पिळवटून टाकणारी दृश्य

उस्मानाबाद | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. जिवंत असताना रुग्णालयात उपचारासाठी रांगेत उभं राहायचं आणि प्राण गेल्यानंतरही अंत्यसंस्कारासाठी रांगेत उभं राहायचं असंच काहीसं चित्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.

उस्मानाबादमध्ये आज तब्बल 23 जणांवर एकाच वेळी एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराची दृश्य पाहून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अंत्यसंस्कारासाठी आता स्मशानभूमी ही अपुरी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उस्मानाबादमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. आज तब्बल 764 कोरोनाबाधित रुग्णांवर उस्मानाबादमध्ये उपचार सुरू आहेत. 1 महिन्यापूर्वी हीच आकडेवारी शंभराच्या घरात होती. महिनाभरात कोरोनाने मोठ्या प्रमाणात उसळी घेतली आहे.

आज उस्मानाबादचा स्मशानभूमीतील दृश्य मन सुन्न करणारी आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या प्रियजनांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी उस्मानाबादमध्ये नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. कोणी भिंतीवर चढून तर कोणी उंच डोंगरावर जाऊन आपल्या जवळच्या व्यक्तीला शेवटचं पाहून अखेरचा निरोप देतानाचं मनाला चटका लावणारं दृश्य आज पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या

भारतासाठी धोक्याचा इशारा, दररोज होऊ शकतो 2320 जणांचा मृत्यू

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महाराष्ट्र सरकार करणार मेगाभरती

कोरोनामुळे घरीच मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; महाराष्ट्रातील ‘या’ तीन शहरांमध्ये सर्वाधिक घटना

पुण्यात कोरोनाचा आकडा वाढताच, वाचा आजची आकडेवारी

कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्स करावा का?; अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More