बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

MPSC ची तारीख तर ठरली पण…; विद्यार्थ्यांसमोर आणखी नवा पेच

मुंबई | काही दिवसांपुर्वी शासनाकडून कोरोनाचं कारण देत एमपीएससी परीक्षा पुढं ढकलल्या जात असल्याने मोठा गोंधळ उडाला होता. पुण्यात एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि मोठं आंदोलन केलं. खुद्द मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालावं लागलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 21 मार्च ही तारीख जाहीर करण्यात आली होती. पण आता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आणखी मोठा पेच निर्माण झाला आहे.

राज्यसेवा आयोगाची पुर्व परीक्षा आणि रेल्वे भरती (आरआरबी) बोर्डाची परीक्षा एकाच दिवशी म्हणजेच 21 मार्चला होणार आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यानं विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांना यातील एकच परीक्षा द्यावी लागेल. या दोन्ही परीक्षेचे सेंटर वेगवेगळे आहेत त्यामुळे दोन्ही परिक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्यातरी एका परीक्षेला मुकावं लागणार आहे.

रेल्वे भरतीची परीक्षा ही पुर्वनियोजित असून देशातील विविध केंद्रावर ही परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा पाच टप्प्याच घेतली जात आहे. रेल्वे भरतीतून यंदा 32 हजार 208 जागा भरल्या जात आहे. तर यासाठी देशभरातून 19 लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.

दरम्यान, याआधी एनएमएमएसची परीक्षा 14 मार्चला होणार होती पण राज्यसेवेच्या परीक्षेमुळं ती 21 मार्चला ढकलण्यात आली होती. पण राज्यसेवेची परीक्षा आता 21 ला होणार असल्यानं बाकी परीक्षांचं नियोजन बिघडलेलं दिसत आहे. तर या सर्व नियोजनात प्रशासनाची कोंडी होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या- 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना आईची आठवण आल्याने केली भावनिक कविता शेअर!

बटलरची खेळी विराटवर भारी; दणदणीत विजयासह इंग्लंड मालिकेत आघाडीवर

‘या’ महापालिका हद्दीतील शिक्षकांना घरून काम करण्याचे आदेश!

महाराष्ट्रासाठी आरोग्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे ‘इतक्या’ कोटी लसींची मागणी!

जाणून घ्या…महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More