बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तेव्हापासून माझ्या मनात राज ठाकरेंबद्दल अ‌ॅट्रॅक्शन, व्हेरी नाईस पर्सनॅलिटी – चंद्रकांत पाटील

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकृंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. त्यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांसमोर जात भेटीचं कारण सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी राज ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक देखील केलं आहे.

कृष्णकुंजवर झालेल्या भेटीत मनसे-भाजप युतीचा कोणताही प्रस्ताव नव्हता, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. आम्ही नाशिकमध्ये होतो. त्यावेळी राज ठाकरे देखील नाशिकमध्ये होते. त्यावेळी आमची भेट झाली होती. त्यावेेळी कधीतरी मुंबईत घरी भेटूया, असं निमंत्रण राज ठाकरे यांनी दिलं होतं. कोणी घरी बोलवलं तर येतो म्हणणं, ही भाजपची आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची स्तुती केली. मी एबीवीपीत होतो, तेव्हापासून माझ्या मनात राज ठाकरेंबद्दल अॅट्रॅक्शन होतं, व्हेरी नाईस पर्सनॅलिटी, फक्त दिसण्यापुरतंच नाही, तर बोलणं, बोलण्यातील स्पष्टपणा, आपल्या मुद्द्यांवर आग्रही राहणं, ते काहीसे फ्लेक्जिबल आहेत. पण थोडे रिजीड देखील आहेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यांनी मला एक व्हिडीओची क्लिप दिली होती. युपीमधलं एक भाषण होतं. ते मी ऐकलं. त्यावर चर्चा देखील झाली, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, तुम्ही तुमची भूमिका बदला की ओ, अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. राज ठाकरे महाराष्ट्राचे नेते झाले पाहिजे. राज ठाकरेंनी मोठ्या भूमिकेत यायला हवं. मनसेच्या इन्फ्रास्ट्रक्चरने राज ठाकरे यांना मोठं व्हायला वेळ लागेल. हे एक माणूस म्हणून बोलणं वेगळं, असंही पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“…तर पवारांची लोंबतेगिरी करणाऱ्या संजय राऊतांवर ही वेळ आली नसती”

…तर आंदोलनात मी स्वत: सहभागी होईल- अण्णा हजारे

पेगॅसस प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवं – सर्वोच्च न्यायालय

“ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्र्यांचा पहिला नंबर”

कांस्य हुकलं पण मन जिंकलं; रोमहर्षक सामन्यात भारताच्या लेकी शेवटपर्यंत ब्रिटनला भिडल्या

“कोण अमृता फडणवीस?, नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More