बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! हाताला काम नसल्यानं तरूणांनी सुरू केला चक्क नोटांचा छापखाना

नाशिक |  देशात कोरोनामुळे लाॅकडाऊन केल्यानं अनेक नागरिकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत 21 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याची आकडेवारी सरकारने दिली होती. त्यामुळे अनेकांना संकटाचा सामना करावा लागला होता. त्यातच आता हाताला काम नसल्यानं तरूणांनी चक्क चलनी नोटांचा छापखाना सुरू केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाशिक येथे भारतीय चलनातील नोटांचा छापखाना आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील तरूणांचा कलर प्रिंटींगचा व्यवसाय आहे. कोरोना टाळेबंदीमुळं त्यांचा व्यवसाय हा बंद पडला आहे. बेरोजगार तरूणांनी शक्कल लढवत बनावट नोटांची छपाई केली आहे. त्यांचा हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर पोलिसांनी छापा टाकत सात तरूणांना अटक केली आहे. या बनावट नोट्यांचे धागेदोरे लासलगावच्या विंचूरपर्यंत पसरले आहेत.

अटक झालेल्या तरूणांनी आतापर्यंत लाखो रूपये किंमतीच्या नोटा छापल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून हे तरूण नोटांची छपाई करत होते. हे सर्व तरूण अगदी नियोजन पद्धतीने नोटा छापून बाजारात चलनात वापरायचे. त्यांच्या शेजारील व्यापाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून बनावट नोटा आढळत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी सर्व तरूणांच्या कारनाम्याचा उघडकीस आणला.

दरम्यान, तरूणांनी थेट चलनी नोटांची छपाई केल्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत कोणाचा राजकीय हात आहे का? याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. यामुळं राजकीय क्षेत्रात देखील खळबळ झाली आहे.

थोडक्यात बातम्या –

…तर मी राजीनामा द्यायला तयार आहे – विजय वडेट्टीवार

‘…म्हणून मला भारतात मुलाला जन्म देण्याची इच्छा नाही’; ‘या’ अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य

‘त्यांच्या मनात अश्लिल अर्थ नव्हता’; चंद्रकांत पाटलांकडून दरेकरांची पाठराखण

‘…तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं’; अण्णा हजारेंचा इशारा

मालेगावचे एमआयएमचे आमदार म्हणतात; “माझ्या जीवाला धोका आहे”

जगाने जरी स्वातंत्र्य दिलं तरीही महिलांना बुरखा घालून….; तालिबान्यांच्या त्या निर्णयावरून यु-टर्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More