सरकारनं टायमिंग साधलं? सिंचन घोटाळ्याप्रकरणी एफआयआर

नागपूर | सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीसाठी धक्कादायक बातमी समोर आलीय. एकिकडे हल्लाबोल आंदोलनाची सांगता सुरु असताना दुसरीकडे सरकारकडून सिंचन घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलाय. 

 नागपूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात एकूण 4 एफआयआर नोंदवण्यात आलेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हे एफआयआर नोंदवले असून गोसेखुर्द सिंचन घोटाळ्याप्रकरणी हे एफआयआर आहेत. त्यामध्ये चक्क तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी या फायलींवर सह्या केल्याचं उघड झाल्याचं कळतंय. 

सरकारने हे पाऊल टाकल्यानं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जातंय. मात्र सरकारच्या टायमिंगबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं जातंय.