बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे-फडणवीस अमित शहांच्या भेटीला, तिघांमधील बैठक रात्री 2 वाजता संपली

मुंबई | शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदे यांनी भाजपला जवळ केले. यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. अद्याप खाते वाटप होणे बाकी आहे. याच दरम्यान शिवसेनेने शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली होती. आता त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय 11 जुलै रोजी आपला निकाल देणार आहे. शिंदे गटाने शिवसेनेला आणखी एक धक्का देत शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर दावा केला आहे.

याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी अमित शहांची भेट घेतली. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरा दोन वाजता संपली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे-फडणवीस अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी नव्या मंत्र्यांच्या शपथविधीसाठी सोमवार उजाडण्याची शक्यता आहे.

अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. मुख्यमंत्री या नात्याने पदभार स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री श्री. अमित शाह यांची भेट घेतली, असं ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या – 

अमरनाथमध्ये ढगफुटी; आतापर्यंत 15 भाविकांचा मृत्यू

‘खाली काही घातलं की नाही?’; ‘त्या’ व्हिडीओमुळे मलायका अरोरा सोशल मीडियावर ट्रोल

‘मी व्हॅनिटी व्हॅनमध्येही सेक्स केलाय, रिस्क असते पण…’; रणवीरने सांगितला तो किस्सा

अभिनेता सुमीत राघवनने महाराष्ट्र सरकारला केली विनंती, म्हणाला…

राज्यातील ‘या’ भागांना रेड अलर्ट जारी, पुढील 24 तास पाऊस झोडपून काढणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More