बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनाथांची माय! सिंधुताई सपकाळ अखेर अनंतात विलीन

पुणे | माई म्हणजेच सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी हद्यविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपाचार सुरु होते. उपाचारादरम्यानचं तीव्र ह्द्यविकाराचा झटका आल्याने त्यांचा निधन झालं. ठोसरपागा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.

हजारोंच्या उपस्थितीत ठोसरपागा येथे सिंधूताईंना अखेरचा निरोप देण्यात आला. आज सकाळी 9:30 वाजता त्यांच पार्थिव बाल निकेतन या त्यांच्या संस्थेत आणले होते. त्यानंतर त्यांना त्याठिकाणी शासकिय इतमामात अखेरचा सलाम देण्यात आला. बाल निकेतन च्या बाहेरही लोकांनी सिंधुताईंचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

सिंधुताईंवर ठोसरबाग दफनभूमी येथे 12:30 वाजता महानुभव पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी येऊन सिंधुताईंचे अखेरचे दर्शन घेतले आहे. शाककिय इतमामात सिंधुताई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

दरम्यान, दिड महिन्यापूर्वी सिंधुताईंना हार्नियाच्या त्रासामुळे हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची त्यांनतंर हार्नियाची शस्त्रक्रिया देखील झाली होती. त्यानंतरही त्यांच्यावर उपचार चालूचं होते. मात्र, मंगळवारी त्यांच्यावर उपचार चालू असतानाचं त्यांना हद्यविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मुख्यमंत्री नाही, तरीही राज्य व्यवस्थित सुरु’; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

‘त्यांच्या निधनाने मला…’; सिंधुताईंच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना

देशात कोरोना रुग्णसंख्येत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ, धडकी भरवणारी आकडेवारी आली समोर

Corona: उद्यापासून पुणे शहरात ‘या’ निर्बंधांचं करावं लागणार पालन

धक्कादायक! पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More