महाराष्ट्र मुंबई

‘संघर्षातून वर आलेल्या धनंजयने आज ते मिळवून दिलं’; सिंधुताईंनी मानले धनंजय मुंडे यांचे आभार

मुंबई | काही स्वयंसेवी संस्था शासनाच्या अटी आणि शर्थींची पूर्तता करत नसल्याने शासनाने अशा 36 अनुदानित वसतिगृहांची मान्यता रद्द केली आहे. बंद पडलेली अनुदानित वसतिगृहे इतर इच्छुक संस्थांना हस्तांतर आणि स्थलांतर करण्याबाबत शासनाने धोरण ठरवलंय. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील आलेगाव पागा तालुका शिरूर येथील बंद पडलेले वसतिगृह हस्तांतरीत करून पुन्हा सुरू करण्याबाबत सिंधुताई सपकाळ यांच्या ‘दी मदर ग्लोबल फाऊंडेशन’ यांचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता.

सिंधुताई यांचे कार्य संपूर्ण राज्याने पाहिले, त्यामुळे माईंच्या संस्थेस सदर अनुदानित वसतिगृह हस्तांतर करण्याबाबत विभागातील अधिकाऱ्यांना धनंजय मुंडेंनी निर्देशित केले होते.

ज्याला कोणी नाही त्याला माई, परंतु माईंच्या कोणत्याही संस्थेस किंवा कार्यास शासकीय अनुदान आजवर मिळालं नाही. पण संघर्षातून वर आलेल्या धनंजयने आज ते मिळवून दिलं. अनाथ, निराधार लेकरांना छत मिळवून दिलं, म्हणून पहिला मान धनंजयचा, असं सिंधुताई सपकाळ म्हणाल्या.

अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या माईंच्या संस्थेसाठी काही तरी करता आलं याचा मला आनंद असून, अनुदानित वसतिगृहाच्या माध्यमातून माईंची संस्था निश्चितच गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आधार केंद्र बनेल, याचा विश्वास असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही- देवेंद्र फडणवीस

अहो दादा, असं मुघलांसारखं काय बोलता?- अमोल मिटकरी

“मुंबईकर टॅक्स भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात”

राज्य सरकारच्या ‘त्या’ चुकीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे- रावसाहेब दानवे

विधान परिषद निवडणुकीत गैरप्रकार झाला, मतदान EVM मशीनवर घ्या- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या