बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 मजुरांचा मृत्यु 3 जण गंभीर जखमी

बुलडाणा |  मुंबई- नागपुर दरम्यान असलेल्या समृद्धी महामार्गावर एका ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. त्या अपघातात  12 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असुन 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सिंदखेडराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. लोखंडी सळई आणि काही मजूरांना घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती समोर येत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील तळेगाव-दुसरबिडमध्ये समृद्धी महामार्गाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले मजूर हे महामार्गावर काम करणारे बिहारी असल्याची प्राथमिक समजत आहे.

समृद्धी महामार्गावरून बुलडाण्यातील सिंदखेडराजा दुसरीबीड येथुन काही मजूर आणि लोखंडी सळई घेऊन एक ट्रक जात होता. त्याचवेळी तळेगावाजवळ हा ट्क पलटला आणि त्यांचा भीषण अपघात झाला. या ट्रकमध्ये एकुण 15 मजूर बसले होते. त्यातील 12 मजूरांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर गंभीर जखमींना उपचारांसाठी जालना येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस ठाण्याचे अधिकारी सोमनाथ पवार यांनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्रातील वाहतुकीसाठी महत्वाचा ठरत असलेला हा महामार्गाचं काम सध्या वेगाने चालू आहे. हा महामार्ग वाहतुकीसाठी लवकरच सुरू करण्यासाठी सरकार वेगाने पावले उचलत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कामं चालू आहेत. अशातच आता या महामार्गावर हा अपघात झाला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! लहान मुलांच्या लसीकरणात पडणार आणखी एका लसीची भर

…तर मी त्याच दिवशी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार होतो- छत्रपती संभाजीराजे भोसले

शरद पवारांनतर अजित पवाराचंही राज ठाकरेंना रोखठोक प्रत्युत्तर

‘या’ गावात सापडला नाही अजून एकही कोरोना रुग्ण!

‘…त्या सर्व प्रकरणांचा एकमेकांशी संबंध’; दाभोळकरांच्या मुलीचा मोठा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More