Aarya Ambekar | गेल्या काही दिवसांपासून एआय (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक सेलिब्रिटींचे (Celebrity) आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल (Viral) करण्यात आले आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana), आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचेदेखील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर हिच्यासोबतही असेच काहीसे घडले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आर्या बोलताना दिसत आहे. मात्र, “मी असं काही बोलले नाही,” असं म्हणत आर्याने संताप व्यक्त केला आहे. (Aarya Ambekar)
आर्याने व्यक्त केला संताप
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर करत आर्या म्हणाली, “काय हा मूर्खपणा आहे! माझ्या कार्यक्रमात मी जे काही बोलले आहे, ते म्युट (Mute) करून तुम्ही माझ्या नावावर वेगळंच काही लिहिलं आहे, जे मी कधी बोललेच नाही. विषय काय आहे, हेदेखील मला माहिती नाही.”
बिग बॉसवर (Big Boss) प्रतिक्रिया
“मी बिग बॉस शो पाहत नाही, कधीच पाहिलाही नाही. मला शोमधील एक स्पर्धकही माहिती नाही. तुम्ही हे जे काही केलंय, त्याच्यासाठी मी तुमच्या विरोधात खटला दाखल करू शकते… अशा चॅनेलला ५० हजार सबस्क्रायबर्स (Subscribers) कसे काय असू शकतात?” अशी पोस्ट लिहित, आर्याने चाहत्यांना व्हिडिओ रिपोर्ट (Report) करण्यासाठी मदत मागितली आहे.
व्हिडिओमध्ये काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये आर्या (Aarya Ambekar) बोलताना दिसत आहे. “पंढरीनाथ दादा सोडले, तर जागेवर स्थिर कोणाचंच चित्त नाही…” असे व्हिडिओवर लिहिले होते. यावर आर्याने संताप व्यक्त केला आहे.
सेलिब्रिटी होतात ट्रोल
सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ फेक (Fake) असतात, ज्यांचा सेलिब्रिटींशी काहीही संबंध नसतो. पण अशा सोशल मीडिया पोस्टमुळे सेलिब्रिटींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अभिनेत्री रश्मिका हिचा फेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीदेखील यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
Title : Singer Aarya Ambekar Deepfake Video Goes Viral