Alka Yagnik | प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक या सध्या एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना दोन्ही कानांनी ऐकू येणे बंद झाले आहे. याबाबत स्वतः अलका याग्निक यांनीच सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
अलका याग्निक यांनी म्हटले की, एका विमान प्रवासातून त्या बाहेर आल्या आणि त्यांना काही ऐकू येईनासं झालं. हा एक मेंदूचा दुर्मिळ आजार आहे, सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस असं निदान डॉक्टरांनी केले असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.
अलका याग्निक यांना झाला दुर्मिळ आजार
अलका याग्निक यांनी पोस्टमध्ये लिहिल की,”माझ्या डॉक्टरांनी मला विषाणूंच्या संसर्गाने रेयर सेंसरी न्यूरो नर्व हियरिंग लॉस झाल्याचे निदान केले आहे… या अचानक झालेल्या आजाराने मला धक्का बसला आहे. या आजाराशी आणि त्यातून आलेल्या नव्या परिस्थितीशी मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.”, असं गायिकेने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
यासोबतच त्यांनी चाहत्यांना एक आवाहन देखील केलं आहे. मोठ्या आवाजात हेडफोन लावून गाणी, संगीत ऐकू नये, असं त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे.तुम्हा सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्याने मी माझे आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत करून लवकरच तुमच्याशी संवाद साधेल. तुमचे प्रेम माझ्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याचे अलका याग्निक (Alka Yagnik) यांनी म्हटले आहे.
अलका याग्निक यांचं चाहत्यांना आवाहन
या पोस्टनंतर बॉलीवुडमधील अनेक कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. गायक सोनू निगम, गायिका-अभिनेत्री इला अरूण यांनीदेखील अलका (Alka Yagnik) यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. दरम्यान, अलका याज्ञिक यांनी 90 च्या दशकात अनेक सुपरहीट गाणी गायली आहेत. अगर तुम चाहो, परदेसी परदेसी, गजब का है दिन, ताल से ताल मिला, चुरा के दिल मेरा, गजब का है दिन, सूरज हुआ मद्धम, अगर तुम साथ हो आणि एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे…ही त्यांची सुपरहीट गाणी आहेत.
News Title : Singer Alka Yagnik suffering from a rare disease
महत्त्वाच्या बातम्या-
“छगन भुजबळांचं उभं आयुष्य गोरगरीबांचं आरक्षण हिसकावण्यात गेलंय”
“विठ्ठलाच्या नावाने दरोडा…”, जितेंद्र आव्हाडांचा सरकारला टोला
अजितदादांचं भाजपला होतंय ओझं?, अजितदादांबाबत पुनर्विचार होणार…
शेअर बाजारने गाठला ऐतिहासिक उच्चांक! काय आहे रेकॉर्ड ओपनिंग लेव्हल
ओबीसी आरक्षणावर गोपीचंद पडळकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…