मोठी बातमी! प्रसिद्ध गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न, का उचलचं टोकाचं पाऊल?

Singer Kalpana Raghavendar Attempts Suicide 

Kalpana Raghavendar | सिनेसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायिका कल्पना राघवेंद्र (Kalpana Raghavendar) हीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. दोन दिवसांपासून तिचे घर बंद होते. अखेर दरवाजा तोडल्यानंतर गायिका बेशुद्ध अवस्थेत आढळली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून तिने हे टोकाचे पाऊल का उचलले असावे, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

गायिका कल्पना राघवेंद्रचं घर दोन दिवसांपासून बंद होतं. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडून आत गेले. कल्पना बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गायिकेने आत्महत्येचा प्रयत्न का केला?

गायिकेने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, कल्पना राघवेंद्रवर सध्या उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना राघवेंद्रचं घर दोन दिवसांपासून बंद असल्याचं तिच्या सुरक्षा रक्षकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. घटना घडली त्यावेळी तिचा पती चेन्नईमध्ये होता. तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे.

1500 हून अधिक गाणी, दिग्गज संगीतकारांसोबत काम

गायिका कल्पना राघवेंद्रने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी संगीत कारकिर्दीला सुरुवात केली.  इलैयाराजा आणि ए.आर. रहमान यांसारख्या संगीतकारांसोबत तिने काम केलं आहे. 2010 मध्ये ‘स्टार सिंगर्स मल्याळम’ स्पर्धेची ती विजेती राहिली आहे. तिने आतापर्यंत1500 हून अधिक गाणी गायली आहेत. अशात तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.  (Kalpana Raghavendar)

Title : Singer Kalpana Raghavendar Attempts Suicide 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .