नवी दिल्ली | गायिका कनिका कपूरने अखेर कोरोनावर मात केली आहे. तिची सहावी टेस्ट निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे तिला रूग्णालयातून डिस्चार्ज देऊन होम क्वारंटाईन केलं गेलं आहे.
कनिकाच्या पहिल्या पाच चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या होत्या. मात्र, त्यानंतरची चाचण्या निगेटिव्ह आल्याने कनिका कपूरच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच तिनेही टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला आहे.
कनिकाच्या डिस्चार्जची बातमीवर तिचा भाऊ अनुरागने शिक्कामोर्तब केलं आहे. लखनऊच्या रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ती आता घरी आहे आणि ठीक आहे, असं त्याने सांगितलं आहे.
तिच्यात चांगली सुधारणा झाली आहे. कानिकाला कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही आणि तिच्यामुळे कोणालाही संसर्ग झाला नाही याचा त्यांना आनंद झाला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्रात नक्की चाललंय काय?, गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा- चित्रा वाघ
वाधवान कुटुंबाला फिरण्यासाठी विशेष पत्र देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी केली कारवाई!
महत्वाच्या बातम्या-
राजभवनात जाऊन काड्या करणं महाराष्ट्राच्या हिताचं नाही- संजय राऊत
आयपीएलमधील या संघाने कोरोना बाधितांसाठी दिले तब्बल 10 कोटी
इस्लामपूर कोरोनामुक्त…. जयंत पाटील चिंतामुक्त!
Comments are closed.