बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गायिका वैशाली माडे हाती राष्ट्रवादीचं घड्याळ बांधत आता राजकारणात घालणार पिंगा

मुंबई | मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीत देखील आपल्या आवाजाची जादू दाखवणाऱ्या वैशाली माडे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुख्यालयात वैशाली माडे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

31 मार्च 2021 रोजीच वैशाली माडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार होत्या. मात्र, कोरोनाचं सावट वाढल्यानं त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंंतर आज वैशाली यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी वैशाली यांचं पक्षात स्वागत केलं आहे.

वैशाली माडे या मूळच्या हिंगणघाट येथील आहेत. अनेक हिंदी व मराठी सिनेमांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केलं आहे. त्या अनेक गायन रिअॅलिटी शोजच्या विजेत्या ठरल्या आहेत. तसेच मराठी ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळे देखील त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.

दरम्यान, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘पिंगा’ हे गाणं देखील वैशाली माडे यांनी गायलं आहे. त्यांचं हे गाणं प्रचंड गाजलं आहे. या गाण्यासाठी वैशाली यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यासोबतंच ‘कलंक’ या सिनेमात त्यांनी गायलेलं ‘घर मोरे परदेसिया’ हे गाणं देखील विशेष गाजलं आहे. आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर जादू चालवणाऱ्या वैशाली माडे आता राजकारणात आपली जादू दाखवू शकतील का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

कोरोनाने हिरावलं आई-बाबांचं छत्र, ‘या’ जिल्ह्यात तब्बल 34 मुले झाली पोरकी

आक्षेपार्ह भाषेतील त्या ट्विटवर किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या….

घोड्यावर उभं राहून करत होता स्टंट अन्…, पाहा व्हिडीओ

लैंगिक शक्ती कशी वाढवाल?; ‘या’ अभिनेत्यानं यूट्यूबवर शेअर केला व्हिडीओ

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात टाळेबंदी, संभाजीराजेंना मोठा धक्का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More