मुंबई | सोशल मीडियावर लोक कायम काही ना काही व्हिडीओ टाकतच असतात. त्यात जन्मदिवस, लग्नाच्या वाढदिवस कसा धूमधडाक्यात साजरा केला याचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. अशातच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेनं गुडघ्यापर्यंत सोन्याचा लांब हार घातलेला दिसत आहे. त्यासोबतच तिचा नवरा तिच्यासाठी गाणं म्हणताना दिसत आहे. तेव्हा त्याच्या बायकोच्या गळ्यातल्या हाराची चर्चा सगळीकडेच रंगली आहे. तो हार तब्बल 1 किलोचा असल्याचं बोललं जात आहे. लॉकडाउनमुळं सोन्याचे भाव गगनाला टेकलेले आहेत त्यात त्यानं खरंच हा सोन्याचा हार बायकोला भेट म्हणून दिला असेल का?, असा प्रश्न सगळ्यांना पडत आहे. तेव्हा या प्रश्नाच उत्तर स्वत: व्हिडीओतल्या व्यक्तीनं दिलं आहे.
‘प्यार हमारा अमर रहेगा, याद करेगा जमाना’ हे ‘मुद्दत’ चित्रपटातलं गाणं या व्हिडीओतला व्यक्ती आपल्या बायकोसाठी गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सगळीकडे फॉरवर्ड होताना दिसत आहे. क्लीप मधील दांपत्य लग्नाचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. त्यात तो हार पतीनं आपल्या पत्नीला भेट म्हणून दिल्याचं सांगितल्या जात आहे.
हा व्हिडीओ कल्याणमधील कोनगावचे राहणारे बाळू कोळी यांचा आहे. त्यांच्या पत्नीनं हा हार घातला आहे. पोलिसांनी हा व्हिडीओ पाहून बाळू कोळी यांना पोलीस स्थानकात बोलावून घेतलं होतं. सध्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे एवढा महागडा हार घालून सोशल मीडियावर टाकू नका चोरी होऊ शकते, असा सल्ला पोलिसांनी दिला. मात्र बाळू कोळी यांनी या हाराबाबत खुलासा केल्यानंतर पोलिसही आश्चर्यचकीत झाले आहेत.
दरम्यान, संबंधित हार खरा नसून खोटा असल्याचं स्वतः बाळू कोळी यांनी पोलिसांना सांगितलं आहे. हा हार आपण बऱ्याच वर्षांपूर्वी घेतला होता. त्याची किंमत 38 हजार रुपये असल्याची माहिती कोळी यांनी यावेळी दिली आहे. यानंतर पोलिसांनी संबंधित हाराची एका सोनाराकडून तपासणी करुन घेतली आहे. तो हार नकली असल्याची पुष्टी ज्वेलरनं केली आहे.
पाहा व्हिडीओ –
VIRAL VIDEO | लग्नाच्या वाढदिवशी नवऱ्याने एक किलो सोन्याचा हार भेट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, मात्र हा हार खोटा असल्याचे खुद्द बाळू कोळी यांनी सांगितले #1KgGoldNecklace | #BaluKoli | #Kalyan | #ViralVideo | #trendingvideo | #Bhiwandi pic.twitter.com/kw3QhwFjRR
— Anish Bendre (@BendreAnish) May 23, 2021
थोडक्यात बातम्या –
घरात रक्ताच्या थारोळ्यात अढळलेल्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं; धक्कादायक कारण आलं समोर
पदोन्नतीच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारमध्ये ठिणगी; ‘या’ काँग्रेस मंत्र्याचा ठाकरे सरकारला इशारा
तरणीबांड मुलं एका तासाच्या अंतराने गेली, वडिलांनीही जीव सोडला!
“महाराष्ट्रातलं सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर विरोधी पक्ष जगतोय”
‘पुण्यातील लहान मुलांचे लसीकरण करा’; बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने दिली महत्वाची सुचना
Comments are closed.