आमदार राम सातपुतेंकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; सभागृहात राडा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आमदार राम सातपुते (Ram satpute) उल्लेख एकेरी केला. यावरुन विधानसभेत आज गदारोळ झाला. राम सातपुतेंच्या वक्तव्यानंतर विधानसभेत गोंधळ उडाला

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सनातन धर्मावर चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केले. यावर मी आक्षेप घेतला. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं नसत मला चाकरी करावी लागली असती, तुम्ही मागासवर्गीय जिल्ह्यातून निवडून येता. असे आव्हाड म्हणाले होते मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले म्हणून मी विधानसभेत निवडून आलो, मला राष्ट्रवादीच्या शरद पवाराने आरक्षण दिले नाही, असं राम सातपुते म्हणाले.

यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ देखील जाग्यावरुन उठून अध्यक्षांना कारवाई करण्याची मागणी केली.

लगेचच आशिष शेलार यांनी जबाबदारी घेत दिलगिरी व्यक्त करीत माफी मागितली, त्यानंतर राम सातपुते यांनीही दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे हा गदारोळ संपुष्टात आला.

महत्त्वाच्या बातम्या-

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe