सिंहगडावर नग्नावस्थेत आढळला अधिकारी, पाहा व्हिडिओ-

पुणे | छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षण्यासाठी ज्या गड-किल्ल्याचा वापर केला. त्या गड किल्ल्यांचं पावित्र्य राखलं जात नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. सिंहगडावर चक्क नग्नावस्थेत सन बाथ घेणारा अधिकारी कॅमेऱ्यात कैद झालाय. या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय.

सिंहगडावरील दूरदर्शन केंद्राच्या आवारात हा प्रकार सुरु होता. लतीफ सय्यद असं या अधिकाऱ्याचं नाव असल्याचं कळतंय.

रविवारी सकाळी ट्रेकिंगसाठी गडावर गेलेल्या काही लोकांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी लतिफला हटकल्यानंतर ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर अधिक प्रश्न विचारले असता त्याने चक्क टॉवेल गुंडाळून पळ काढला.