बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सर माझं नाव सनी, मी बाहेर जाऊ शकतो का?’; नेटकऱ्याला मुंबई पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

मुंबई | मुंबईत कोरोनाचा संसर्ग थोड्याफार प्रमाणात आटोक्यात येत असल्याचं दिसत आहे. तरी सुद्धा कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहे. मुंबई पोलीसही आपली भूमिका चोख बजावताना दिसत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनानं लॉकडाऊन जाहीर केलं. लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार विनाकारण रस्त्यावर नागरिकांना फिरण्यास मनाई आहे. तरी काही नागरीक नियमांची पायमल्ली करताना दिसतात.

मात्र, एका व्यक्तीन थेट मुंबई पोलिसांना बाहेर फिरण्यासाठी परवानगी मागितली. त्याला मुंबई पोलिसांनी जबरदस्त उत्तर दिलं आहे. याची चांगलीच चर्चा रंगली आहे. मुंबई पोलीस नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी नेहमीच ट्वीटरवर अॅक्टीव असतात. कधी मीम्स, सिनेमातील डायलॉगचा वापर करत पोलीस ट्विटरवर कोरोना व्हायरस, लॉकडाऊन नियमांसंदर्भात जागरुकता निर्माण करत असतात.

मुंबई पोलीस आयुक्तांनी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटमध्ये उन्हाचा दिवस आहे. भर उन्हात बाहेर जाण्यापेक्षा घरीच राहणं सोयीस्कर आहे. यावर एका यूजरनं वरिष्ठ पोलिसांच्या पोस्टवर रिप्लाय करत एक प्रश्न विचारला. या यूजरनं विचारलं, ‘सर माझं नाव सनी. मी बाहेर जाऊ शकतो का?… मुंबई पोलिसांनी या यूजरला जबरदस्त उत्तर देत सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.

दरम्यान, ‘सर जर तुम्ही खरोखर सौर यंत्रणेच्या मध्यभागी असणारा तो तारा असाल, ज्याभोवती पृथ्वी आणि सौर यंत्रणेचे इतर ग्रह फिरतात. तर तुमच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:चं आणि आजूबाजूच्या लोकांचं रक्षण केलं पाहिजं. त्यामुळे बाहेर पाऊल टाकू नका आणि स्वत: ला कोरोना व्हायरसच्या संपर्कात आणू नका, असं उत्तर पोलिसांनी दिलं. मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्विटवर अनेक यूजरर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

 

 

 

थोडक्यात बातम्या –

पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत- चंद्रकांत पाटील

‘मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा’; संभाजीराजेंची पवारांकडे मागणी

फोन वरुन ओळख, लाॅजवर भेट अन् नंतर घडला धक्कादायक प्रकार

नेहरूंच्या स्मृतीदिनी वाजपेयींचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटलांचा भाजपला टोला, पाहा व्हिडीओ

नदीवर पाणी प्यायला गेलेल्या कुत्र्यावर मगरीनं केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More