महाराष्ट्र मुंबई

पत्नीला चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, डोक्यात दगड घालुन पत्नीच्या माहेरच्यांकडून जावयाची हत्या

मुंबई | वारंवार बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करत असल्यामुळे याविषयीचा मनात राग धरुन भावाने आपल्याच बहिणीच्या नवऱ्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव मोहम्मद सुलेमान अब्दुल शेख असं आहे. अब्दुल शेख याने चार लग्न केली होती. यातील दुसऱ्या क्रमांकाच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

बहिणीचा नवरा तिला त्रास देतो, मारहाण करतो. याचा राग मनात धरुन रामेश्वर चौधरी, सोमेश्वर चौधरी, बंडू चौधरी आणि लक्ष्मण उर्फ पोपट चौधरी या चोघांनी त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. यांनी मोहम्मद शेख यांच्या डोक्यात दगड घालुन त्याची हत्या केली.

दरम्यान, या हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन तासात चौघांना अटक केली. यानंतर त्यांना भोईवाडा न्यायलयात हजर करण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या-

मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?, मी सरकारशी बोलतो- राज ठाकरे

डाॅ. राजेश देशमुख पुण्याचे नवे जिल्हाधिकारी

“आदित्य ठाकरे सक्षम नेता, त्यांच्यात काम करण्याची जिद्द आहे

‘दृश्यम’ फेम दिग्दर्शक निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर; मृत्यूची बातमी खोटी असल्याचं रितेश देशमुखचं ट्वि

“साहेब…जगाचं राहू द्या, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या