मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT ने उचललं मोठं पाऊल

SIT applies for police custody of sudarshan ghule in  santosh deshmukh murder case

Santosh Deshmukh Murder Case | मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याच्याविषयी काही महत्त्वाचे पुरावे एसआयटीला (SIT) सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी (Police Custody) मिळवण्यासाठी एसआयटीने बीडच्या (Beed) न्यायालयात अर्ज केला आहे.

संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणात (Extortion Case) सुदर्शन घुले याच्यावर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई झाली आहे. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली होती. आता एसआयटीला पोलीस कोठडी मिळावी असा अर्ज मकोका कोर्ट विशेष न्यायाधीश सुरेखा आर पाटील (Surekha R Patil) यांच्याकडे देण्यात आला आहे.

९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ ते ३.१५ च्या दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांचे घटनास्थळावरून अपहरण (Kidnapping) झाले होते. यावेळी वाल्मिक कराडशी (Walmik Karad) सहआरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे (Vishnu Chate) या दोघांचे दूरध्वनीवरून संभाषण झाले होते. त्यानंतर मस्साजोग-मांजरसुंबा (Manjarsumba) वरील डोनगाव फाटा (Dongaon Phata) टोल नाक्याजवळ संतोष देशमुख यांचा खून झाल्याचे आढळून आले.

२९ नोव्हेंबर २०२४ मधील कथित सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासल्यानंतर वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि सरपंच अपहरण आणि खून प्रकरणाचा संबंध असल्याचे एसआयटीला दिसून आले होते. आता सुदर्शन घुलेबाबत एसआयटीला नवे पुरावे सापडले असून, बीड न्यायालयाकडे एसआयटीने सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.

एसआयटीच्या अर्जात काय म्हटले आहे?

संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी एसआयटीकडून बीड न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुदर्शन घुले संदर्भात काही पुरावे सापडल्यामुळे एसआयटीला त्याची पोलीस कोठडी हवी आहे. या संदर्भातला अर्ज मकोका कोर्ट विशेष न्यायाधीश सुरेखा आर पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्याकांडामध्ये आणि खंडणी प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाईही झाली आहे. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यावेळी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी पोलीस कोठडीचा अधिकार अबाधित ठेवावा असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. गरज पडल्यास आरोपी सुदर्शन घुलेसह इतर आरोपींना पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार अबाधित ठेवावा असेही यात म्हटले होते. (Santosh Deshmukh Murder Case)

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि मकोका अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील (Kiran Patil) बीड जिल्हा न्यायालयात हजर आहेत. सरकारी पक्षाकडून वकील बाळासाहेब कोल्हे (Balasaheb Kolhe) हे हजर राहतील. आरोपीचे वकील तिडके हे देखील बीड जिल्हा न्यायालयात हजर राहणार आहेत.

Title: SIT applies for police custody of sudarshan ghule in  santosh deshmukh murder case

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .