बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बसल्या बसल्या त्याने चोरी करुन पळणाऱ्या चोराला पकडलं, पाहा व्हिडीओ

बॅंकॉक | सोशल मीडियावर जगभरातील वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच थायलंडमधील चोरीच्या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एखाद्या चित्रपटात ज्याप्रमाणे चोरी करून पळणाऱ्या चोराला हिरो एका झटक्यात पकडतो, असंच काहीसं या व्हिडीओमध्ये झालेलं दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पांढऱ्या रंगाची टोपी घातलेली एक तरुणी मॉलमध्ये आली आहे. ही तरुणी मॉलमधील ज्वेलरी शॉपमध्ये जाते. तेथील सेल्समनला एक चिट्ठी दाखवते. यानंतर सेल्समन काऊंटरवर काही दागिने तिला दाखवण्यासाठी ठेवतो.

सेल्समनची नजर दुसरीकडे जाताच ही तरुणी दागिने आपल्या हातात असलेल्या बॅगमध्ये भरु लागते आणि तिथून पळ काढते. चोरी करुन पळणाऱ्या या तरुणीला पकडण्यासाठी तिच्या पाठीमागे इतर काही लोक पळू लागतात. पुढे या मॉलमध्ये एका काऊंटरच्या बाहेर बसलेला व्यक्ती असं काही करतो की, ही तरुणी एका झटक्यात सापडते.

चोरी करुन पळणारी तरुणी या व्यक्तीशेजारी पोहोचते तेव्हा हा व्यक्ती आपला एक पाय लांब करतो. यामुळे ही व्यक्ती त्याच्या पायात अडकून खाली पडते. यानंतर एक महिला गार्ड चोरी करुन पळणाऱ्या तरुणीला एका बाजूने पकडते तर बाकी लोक देखील धावत येवून तिला पकडतात. मॉलमधील ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सध्या हाच व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

 

 

थोडक्यात बातम्या –

कोणताही क्लास न लावता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशवंतने UPSC केली क्रॅक!

“मोदींना टक्कर देऊ शकेल असा कोणता नेता असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत”

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

रोमांचक सामन्यात पंजाबचा दणदणीत विजय! सनरायजर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More