Office Work | आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेक जण दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करतात, ज्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. सतत 6-8 तास बसून राहिल्याने मसल्स कमकुवत होतात, वजन वाढते आणि मानसिक तणावासारख्या समस्या उद्भवतात. मात्र, काही साध्या सवयी अवलंबून तुम्ही या समस्यांपासून दूर राहू शकता. (Office Work )
सतत बसून राहिल्याने होणाऱ्या आरोग्य समस्या
- दीर्घकाळ एका पोश्चरमध्ये बसून राहिल्यास मणक्यांवर ताण येतो.
- सतत बसल्याने खांद्यांमध्ये आणि हातांमध्ये वेदना जाणवू शकतात, ज्यामुळे दीर्घकालीन त्रास निर्माण होऊ शकतो.
- कमी हालचालीमुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज जळत नाही आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो.
- सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि मानसिक तणाव वाढतो.
- शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे थकवा आणि सुस्ती जाणवते.
- शारीरिक हालचाली अभावामुळे झोपेच्या समस्या वाढू शकतात.
हे उपाय अवलंबा आणि रहा तंदुरुस्त
- सतत बसून काम करत असल्यास प्रत्येक 30-40 मिनिटांनी उठून काही पावले चालावे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला ऑक्सिजन मिळतो.
- ऑफिसमध्येच हलक्या फुलक्या स्ट्रेचिंग व्यायामाचा समावेश करा, ज्यामुळे स्नायूंवरील ताण कमी होईल. (Office Work )
- कामाच्या वेळी लहान-लहान ब्रेक घ्या. यामुळे शारीरिक हालचाल वाढेल आणि लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येईल.
- भरपूर पाणी प्या, कारण शरीर हायड्रेटेड राहिल्यास मेटाबॉलिज्म सुरळीत राहतो.
- संतुलित आहार घ्या आणि ताज्या फळ-भाज्यांचा आहारात समावेश करा.
Title : Sitting for Long Hours in Office Work It Affects Your Health