सावधान! टाॅयलेट सीटवर बसणं ठरु शकतं धोकादायक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | आपला दिवस चांगला जाण्यासाठी पोट साफ असणं गरजेचं आहे. सकाळी किंवा इतरवेळी टाॅयलेटला (Toilet) जातेवेळी आपण आपला फोन किंवा टाइमपास होण्यासाठी एखादी गोष्ट घेऊन जातो. त्यात आपण इतकं गुंतून जातो की टॅायलेटमध्ये किती वेळ गेला याची कल्पनाच राहत नाही. असं केल्यानं मात्र आपण गंभीर आजारांना आमंत्रण देतो.

तज्ज्ञांच्या मते टाॅयलेटमध्ये किंवा टाॅयलेटसीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणं अंत्यत धोकादायक ठरु शकतं. टाॅयलेटच्या आत किंवा टाॅयलेटसीटवर भयंकर असे धोकादायक जंतू (Germs) असतात, अनेकदा टाॅयलेट साफ करुनदेखील ते जात नाहीत. जेव्हा आपण फोन किंवा काही वस्तू घेऊन जातो तेव्हा ते फोनला चिकटतात.

टाॅयलेटमधून बाहेर येताना त्या फोन आणि इतरवस्तूसोबत घरात येतात. यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडू शकता. जास्तवेळ टाॅयलेटसीटवर(Toilet seat) बसण्यानं मुळव्याध (hemorrhoids) होण्याचा धोका जास्त असतो. पाठीच्या खालच्या भागाच्या स्नायूंवर दिर्घकाळ ताण पडल्यानं मूळव्याध होतो. जास्त वेळ टाॅयलेटसीटवर बसल्यानं असं होऊ शकतं.

पोट साफ होण्यासाठी आपण टाॅयलेला जातो, मात्र जास्त वेळ टाॅयलेटसीटवर बसल्यानं याचा परिणाम उलट होऊ शकतो. टाॅयलेटसीटवर जास्त वेळ बसल्यानं गोलंदाजीच्या हालचालीवर परिणाम होता. यामुळे बद्धकोष्ठतेची (Constipation) समस्या वाढू शकते. पोट नीट साफ ने होण्याची समस्याही वाढते.

चांगल्या शरीरयष्ठीसाठी आणि आरोग्यदायी राहण्यासाठी हाड (Bone) मजबूत असणं गरजेचं आहे. टाॅयलेटसीटवर जास्त वेळ बसल्यानं शरीराची हाडे सैल होतात. यामुळे पोटाची आणि पाठीची हाडे सैल होतात. एकाच स्थितीच जास्तवेळ बसल्यानं पायाची हाडं कमकुवत होतात. दरम्यान, या सगळ्या गोष्टींपासून वाचायचे असल्यास टाॅयलेटमध्ये 10 मिनिटांपेक्षा जास्तवेळ बसण्यास आणि कोणत्याही वस्तू घेऊन न जाण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या